पुणे दिनांक २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे.त्यामुळे संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास झाला आहे.दरम्याण कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे.मध्य रेल्वेकडून विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.जलद मार्गावरील ही वाहतूक ही खोळंबली आहे.अनेक लोकल रेल्वे ट्रॅक वर थांबल्या आहेत.कुर्ला घाटकोपर येथील देखील वाहतूक विस्कळित झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.