पुणे दिनांक २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मराठा आंदोलक व मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा अचानकपणे बिघडली आहे.त्या मुळे त्यांना उपचारासाठी तातडीने संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.मागील वेळी त्यांना थकवा व अशक्त पणा आला असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे.व त्यांचा दौरा सुरूच आहे.आज ते बीड येथे असताना त्यांची तब्येत अचानकपणे खालवली असता त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.