पुणे दिनांक २५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उत्तर मध्य मुंबई या जागेचा अखेर तिढा सुटला असून महाविकास आघाडीच्या वतीने काॅग्रेस पक्षाच्या आमदार वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.यापूर्वी वर्षा गायकवाड यांनी जागा वाटपा मध्ये पक्षाने विचारात घेतले नाही म्हणून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.अखेर आज काॅग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान वर्षा गायकवाड यांना उमेदवारी घोषित केली जात नसल्या बद्दल शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता.दरम्यान वर्षा गायकवाड या दलित कुटुंबातील असल्याने त्यांना उमेदवारी देऊ नये. असा सल्ला ऊध्दव ठाकरे यांनी काॅग्रेसला दिला आहे.असा गौप्यस्फोट मिलिंद देवरा यांनी केला होता.दरम्यान काॅग्रेस पक्षातून देखील वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नेमणूक करताना देखील विरोध झाला होता.दरम्यान आता उत्तर मध्य मुंबई करिता महाविकास आघाडीच्या वतीने काॅग्रेस पक्षाच्या वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर महायुतीच्या वतीने अद्याप कोणतीही उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली नाही.त्यामुळे वर्षा गायकवाड यांची लढत कोणासोबत असेल हे लवकरच सिद्ध व्होईल.