Home क्राईम धुळ्यात संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर केली तुफान दगडफेक ४ पोलिस जखमी पोलिसांनी...

    धुळ्यात संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर केली तुफान दगडफेक ४ पोलिस जखमी पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

    142
    0

    पुणे दिनांक २५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात दगडफेकीची घटना घडली आहे.यात संतप्त झालेल्या जमावाने 👮 पोलिसांवर दगडफेक केली आहे.सदरच्या दगडफेकीत एकूण चार पोलिस कर्मचारी हे जखमी झाले आहेत.दरम्यान यावेळी संतप्त झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी साठी पोलिसांनी अश्र्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.तसेच सौम्य लाठीचार्ज देखील केला आहे.दरम्यान तरुणांची हत्या केलेल्या आरोपीला आमच्या हाती द्या अशी मागणी करत जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आहे.यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी देखील जोरदारपणे राडा केला आहे.

    दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील करवंद गावात मुलाला मारहाण केली म्हणून जाब विचारला म्हणून एका युवकाची हत्या करण्यात आली होती. दरम्यान या हत्याबाबत पोलिस यांनी संशयित आरोपींना अटक केली होती.दरम्यान या आरोपींना ज्या पोलिस ठाण्यात ठेवले त्या पोलिस ठाण्याबाहेर हत्या झालेल्या युवकांच्या नातेवाईकांनी हल्ला केला व ‘आरोपीला आमच्या ताब्यात द्या.आमच्या समोर त्याला फाशीची शिक्षा द्या.अशी मागणी करत नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर जोरदार राडा केला.यावेळु संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.या दगडफेकीत चार पोलिस कर्मचारी हे जखमी झाले आहेत.

    दरम्यान या वेळी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी एकूण १० अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.यावेळी जमाव हा खुपच आक्रमक झाला होता.यावेळी पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणण्यासाठी व पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्र्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच सौम्य लाठीचार्ज देखील पोलिसांनी यावेळी केला आहे.दरम्यान पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणले आहे.या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी पोलिसांनचा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

    Previous articleआयपीएल टाॅस झाला.आरसीबी करणार फलंदाजी
    Next articleउत्तर मध्य मुंबईत काॅग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here