पुणे दिनांक २५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथील बांसवाडा येथे केलेल्या विखारी विधानाची चौकशी निवडणूक आयोगाने सुरू केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.दरम्यान मोदी यांनी असे विधान केले होते की काॅग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर लोकांच्या मालमत्तेचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल.असे विखारी विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.या विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस व माकपने निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान दोन समाजात फूट पाडणारे. तसेच दुर्भावनापूर्ण आणि विशिष्ट समुदायाला लक्ष करणारे आहे.अशी तक्रार करत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची विनंती काॅग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.तसेच निवडणूक आयोगाच्या वतीने भाजपावर तत्काळ कारवाई करावी आणि मोदींवर गुन्हाही दाखल करावा अशी मागणी सीपीआय (एम) चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली आहे.