Home राजकीय लग्न सोहळ्यानंतर परतणाऱ्या जदयूच्या नेत्यांची गोळ्या झाडून हत्या.संतप्त जमावाने पाटणा-गया महामार्गावर केला...

  लग्न सोहळ्यानंतर परतणाऱ्या जदयूच्या नेत्यांची गोळ्या झाडून हत्या.संतप्त जमावाने पाटणा-गया महामार्गावर केला रास्ता रोको

  38
  0

  पुणे दिनांक २५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारची राजधानी पाटणा येथे लग्न सोहळ्यानंतर परतणाऱ्या जदयूच्या नेत्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.सदरची घटना ही पुनपुन येथे घडली असून जदयूचे युवा नेते सौरभ कुमार यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान या खळबळजनक घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने पाटणा – गया महामार्गावर रास्ता रोको करत हा मार्ग अडवला होता.

  दरम्यान या घटनेबाबत अधिकृत सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पुनपुन येथे एका लग्न सोहळ्यांचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना बुधवारी रात्रीच्या सुमारास त्यांचावर अचानकपणे गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.ते मित्रा समावेत येत होते.यावेळी पुनपुन येथे चार दुचाकीस्वारांनी अचानकपणे येऊन त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.या गोळीबारात सौरभ यांच्या डोक्याला दोन गोळ्या लागल्या त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.तर या गोळीबारात त्यांच्या सोबत असलेल्या मुनमुन यांना तीन गोळ्या लागल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर पाटणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पाटलीपुत्र येथील राजदच्या लोकसभा उमेदवार व लालूप्रसाद यांच्या कन्या मीसा भारती यांनी सौरभ कुमार यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.दरम्यान या गोळीबाराच्या तपासा साठी विशेष पोलीस पथक रवाना झाले असून ते आरोपींचा शोध घेत आहेत.

  Previous articleराजस्थान मधील बांसवाडा येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची चौकशी सुरू
  Next articleआयपीएल टाॅस झाला.आरसीबी करणार फलंदाजी

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here