पुणे दिनांक २६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) केरळ राज्याचे मुख्यमंत्री पनराई विजयन यांनी जेलवारी टाळण्यासाठीच भाजप बरोबर तह केला.अशा शब्दांत काॅग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत जोरदार हल्लाबोल केला आहे.अनेक घोटाळे बाहेर येऊन देखील मोदी सरकारने विजयन यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही.याकडे यावेळी प्रियंका गांधी यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान बोलताना पुढे त्या म्हणाल्या की माकपाच्या जेष्ठ नेत्यांचे अनेक घोटाळे समोर आले आहेत.परंतु नरेंद्र मोदी नेतृत्वाखालील केंद्र सरकारने त्यांच्या विरोधात अद्याप कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही.असा आरोप देखील प्रियंका गांधी यांनी यांनी केला आहे.दरम्यान केरळचे मुख्यमंत्री विजयन हे राहुल गांधी यांच्यावर आरोप करतात.पण ते भाजप विरोधात अवाक्षरही काढत नाहीत.जेव्हा कुणी योग्य व्यक्ती मैदानात उतरतो तेव्हा त्याच्य विरोधात सर्व शक्ती एकत्र येतात.असे देखील प्रियंका गांधी म्हणाल्या.दरम्यान राहुल गांधी पुन्हा एकदा काॅग्रेस पक्षाच्या वतीने वायनाड येथून निवडणुक रिंगणात उतरले आहेत.