Home राजकीय नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधलं.मी रामनवमीला जन्मलो यांचा अभिमान.जयश्रीराम : हसन...

  नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधलं.मी रामनवमीला जन्मलो यांचा अभिमान.जयश्रीराम : हसन मुश्रीफ

  48
  0

  पुणे दिनांक २७ एप्रिल २७ (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कोल्हापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.दरम्यान कोल्हापूर येथील तपोवन मैदानावर ही सभा होत होत आहे.या सभेत बोलताना महायुतीच्या नेतेमंडळी उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना प्रचंड मतांनी विजयी करा.असे आवाहन मतदारांना केले आहे.

  दरम्यान महायुतीच्या प्रचाराची धुरा सांभाळत असलेले व प्रचाराची जबाबदारी सांभाळत असलेले वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी लोकसभा उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोघांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला.तसेच मागील ५०० वर्षांपासून मागणी असलेले राम मंदिर पूर्ण केल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.माझा जन्म देखील राम नवमीला झाला असून याचा मला अभिमान आहे.असे म्हणत त्यांनी जय श्रीराम असा नारा देखील यावेळी दिला.दरम्यान यावेळी हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पंतप्रधान मोदी यांच्याकडे प्रमुख चार मागण्या कराव्यात अशी विनंती केली.यात यशवंत चव्हाण यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी करावी.अशी विनंती हसन मुश्रीफ यांनी केली.त्याच बरोबर कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर विकास आराखडा.व ज्योतिबा मंदिर विकास आराखडा.तसेच नरसोबावाडी मंदिर विकास आराखडा व विकास निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करावी असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हणाले

  Previous articleउज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई मधून भाजपची उमेदवारी पुनम महाजन यांचा पत्ता कट
  Next articleपुण्यात हडपसर येथील रेसकोर्सवर पंतप्रधान मोदीची सभा वाहतूक व्यवस्थे मध्ये बदल

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here