Home राजकीय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हेलिकॉप्टर मध्ये बसताना पडल्या

  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हेलिकॉप्टर मध्ये बसताना पडल्या

  50
  0

  पुणे दिनांक २७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व  तुणमूल काॅग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी या हेलिकॉप्टर मध्ये बसताना पडल्या आहेत.यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.सदरची घटना दुर्गापूर या भागात घडली आहे.याची माहिती ‘ए एन आय ‘ या वृत्तसंस्थाने सदर घटनेचा व्हिडिओ शेअर करत दिली आहे.

  दरम्यान सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र लोकसभा निवडणुकीची संपूर्ण भारतात रणधुमाळी सुरू आहे.दरम्यान पश्चिम बंगाल मध्ये तुणमूल काॅग्रेस स्वबळावर लोकसभा निवडणूक लढत आहे.तुणमूल काँग्रेस पक्षाच्या वतीने शत्रुघ्न सिन्हा यांना आसानसोल मतदार संघामधून तिकीट दिले आहे.त्यांच्या प्रचारासाठी ममता बॅनर्जी या दुर्गापूर येथून आसानसोल येथे हेलिकॉप्टर मधून जात असताना त्या हेलिकॉप्टर मध्ये बसताना पडल्या या वेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ मदत केल्याने ममता बॅनर्जी या सावरल्या आहेत.त्यांची दुखापत ही गंभीर स्वरूपाची नाही.त्यानंतर लगेच आसानसोलकडे प्रचारा करीता हेलिकॉप्टरने रवाना झाल्या आहेत अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

  Previous articleमोदी गुजरातचे पंतप्रधान संजय राऊतांची टिका
  Next article२० लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी तीन वकील व पोलिस कर्मचाऱ्यासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here