Home Breaking News मणिपूर मध्ये आज पहाटे कुकी कट्टरपंथीयांकडून सीआरपीएफ बटालियनवर हल्ला दोन जवान शहीद

मणिपूर मध्ये आज पहाटे कुकी कट्टरपंथीयांकडून सीआरपीएफ बटालियनवर हल्ला दोन जवान शहीद

41
0

पुणे दिनांक २७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज पहाटेच्या सुमारास कुकी कट्टरपंथीयांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केल्याची माहिती हाती आली असून या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत.सदर घटनेची माहिती देताना मणिपूर पोलिसांनी सांगितले की आज पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास कुकी कट्टरपंथीयांकडून कडून अचानकपणे झालेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सीआरपीएफच्या दोन जवानांना या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे.दरम्यान हे दोन्ही जवान मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील नरसेना भागात तैनात सीआरपीएफच्या १२८ व्या बटालियनचे होते. दरम्यान मणिपूर मध्ये हिंसाचाराचे चक्र सुरूच आहे.ते थांबण्याचे चिन्ह एकंदरीत दिसत नाही.

Previous articleवाहन चालकांला आली भोवळ ७ ते ८ वाहनांना धडक पुण्यात भीषण अपघात!
Next articleपुण्यात मेट्रोचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here