Home क्राईम मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर टायर फुटल्याने बसने घेतला पेट सुदैवाने जीवितहानी...

    मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर टायर फुटल्याने बसने घेतला पेट सुदैवाने जीवितहानी टळली

    121
    0

    पुणे दिनांक २७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर भरघाव वेगाने जाणाऱ्या खासगी बसचे टायर फुटल्याने बसने पेट घेतला आहे.सदरची बस पुण्यातून मुंबईच्या दिशेने जात असताना ही खळबळ जनक घटना आढे गावाजवळ सकाळच्या सुमारास घडली आहे.दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टायर फुटल्याने अचानकपणे पेट घेतला आहे.या बसमधून अनेक प्रवासी हे प्रवास करत होते.दरम्यान बस‌चालकाने प्रसंगावधान दाखवून तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना बसच्या खाली उतरवले त्यामुळे कोणत्याही प्रकारची सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

    दरम्यान या खासगी बसला लागलेली 🔥 आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली आहे.व आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान महाराष्ट्र पोलीस केंद्र वडगांव जवळ हद्दीत किलोमीटर ७८ पुणे लेनवर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खासगी बसचे टायर फुटल्याने या बसला आग लागली आहे.दरम्यान शाॅकसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.या बस मध्ये एकूण ३६ प्रवासी हे प्रवास करत होते.दरम्यान बसला लागल्याली आग ही आय आर बी पेर्टोलिंग व देवदूत यंत्रणा तसेच डेल्टा फोर्स.वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान सुदैवाने या बसमधील सर्व प्रवासी हे सुखरुप आहेत.अशी माहिती मिळत आहे.

    Previous articleबसमध्ये तिकिटावरुन वाद.. बसच्या कंडक्टरवर 🗡️ हल्ला
    Next articleमोदी गुजरातचे पंतप्रधान संजय राऊतांची टिका

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here