पुणे दिनांक २७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आम्हाला कोट्यवधी रुपये मिळणार आहेत.तुम्हाला बक्षिस पत्र करुन देतो.असे सांगून महिलेची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणात तीन वकील व पोलिस कर्मचारी यांच्यासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरचा प्रकार हा सन जुलै २०१६ ते एप्रिल २०२४ या कालावधीत शिवाजीनगर कोर्ट परिसरात व इतर ठिकाणी घडला आहे.सदर फसवणूक प्रकरणी मोनिका मंदार खळदकर ( वय ४० रा.दागंट पाटील नगर शिवणे पुणे) यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.या फिर्यादी वरुन मनीषा करडे मंगला राठोड.सुभाष उत्तेश्वर अवघडे.वकील तुकाराम कटुले.वकील .अनिल मिसाळ.वकील अनंत संकुडे व अनोळखी पोलिस कर्मचारी यांच्यावर आयपीसी ४२०.४०६.४६७.४६८.व ३४.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या फसवणूक प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अजित बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. यातील आरोपी यांनी अपसात संगनमत करून आम्हाला कोट्यवधी रुपये मिळणार आहेत.टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हाला बक्षीस पत्र तयार करून देतो असे खोटे सांगितले.व बक्षीस पत्र तयार करण्याच्या बाहाण्याने व वेग वेगळी कारणे सांगून आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैशाची मागणी केली.त्यानुसार फिर्यादी यांनी २० लाख रुपये दिले.दरम्यान आरोपी यांनी खोटी कागदपत्रे तयार करून ते खरे असल्याचे भासवून खोटे कागदपत्र तयार करुन ते कोर्टाचे रेकॉर्ड आहे.असे भासवून आरबीआय रिझर्व्ह बँक चे खोटे सर्टिफिकेट तयार केले.त्यासाठी खोटे रबरी शिक्के तयार केले.आरोपी यांनी सर्टिफिकेटवर अशोक स्तंभ असलेला शिक्का मारला.मात्र हे सर्टिफिकेट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर मोनिका खळदकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे करीत आहेत.