Home क्राईम पुण्यातून अपहरण केलेल्या सहा महिन्यांच्या बाळाची सोलापूरात तीन लाख रुपयांना विक्री.पुणे पोलिसांनी...

    पुण्यातून अपहरण केलेल्या सहा महिन्यांच्या बाळाची सोलापूरात तीन लाख रुपयांना विक्री.पुणे पोलिसांनी अपहरण करणाऱ्या टोळीच्या कर्नाटकातून आवळल्या मुसक्या

    105
    0

    पुणे दिनांक ३० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे रेल्वे स्टेशनवरून सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करून त्याची विक्री सोलापूर येथे तीन लाख रुपयांना विक्री करणाऱ्या कर्नाटक येथील टोळीचा पुणे बंडगार्डन पोलिसांनी पर्दाफाश करुन या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.तसेच सहा महिन्याच्या बाळाची सुखरूपपणे सुटका केली आहे.दरम्यान अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे १) चंद्रशेखर मलकप्पा नडुगंडी ( वय २४ रा.जंबगी जिल्हा विजापूर कर्नाटक) २) सुभाष पुतप्पा कांबळे ( वय ५५ रा.लवंगी जिल्हा सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत.

    दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेलंग हे यवतमाळ येथून पुण्यातील नातेवाईक यांच्याकडे आले होते.रात्री ते पुणे रेल्वे स्टेशनवर झोपले होते.दरम्यान पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आईच्या कुशीत झोपलेल्या सहा महिन्यांच्या बाळाला उजळून नेले. दरम्यान तेलंग दांपत्य यांनी बाळाची सर्वत्र शोधाशोध केली पण ते मिळून न आल्याने त्यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली. होती दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस आयुक्त ( पश्चिम विभाग) प्रविण कुमार पाटील व परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील सहायक आयुक्त संजय सुर्वे.व बंडगार्डन पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी तपास पथकास सुचेना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक ( गुन्हे) श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली होती.पुणे बंडगार्डन पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशनच्या आसपास व जवळील एकूण ५० सी सी टिव्ही फुटेज चेट केली होती.

    दरम्यान यातील संशयित आरोपी हे नेमके कोणत्या मार्गाने गेले हे निष्पन्न होत नव्हते.दरम्यान बाळाचे अपहरण करून आरोपी हे बाय रोड गेले असावे असा पोलिसांनी निश्कर्ष काढला.व तांत्रिक विश्लेषण सुरु केले. दरम्यान यातील आरोपी हे कर्नाटक येथील विजापूर येथे गेल्याचे अखेर निष्पन्न झाले.व त्यानंतर पोलिसांनी 👮 यातील आरोपी नडुगंडी याच्या विजापूर येथून मुसक्या आवळल्या.दरम्यान यांने त्याच्या अन्य चार साथीदारांच्या मदतीने या बाळाचे अपहरण केले होते.व हे बाळ सोलापूर येथील आरोपी कांबळे याला तीन लाख रुपयांना विक्री केल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी विजापूर येथील एका हाॅटेल मधून कांबळे याला अटक करून या सहा महिन्याच्या बाळाची सुटका केली आहे.

    Previous articleशिवसेनेला मशाल चिन्ह मिळतात शिवसैनिकांमध्ये एकच गाण्याची धून “उष काल होता होता काळ
    Next articleदिल्लीत न‌ऊ शाळांमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी.बाॅम्ब शोधक यंत्रणा घटनास्थळी दाखल विद्यार्थी व पालकांन मध्ये चिंतेचे वातावरण

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here