Home शैक्षणिक दिल्लीत न‌ऊ शाळांमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी.बाॅम्ब शोधक यंत्रणा घटनास्थळी दाखल विद्यार्थी व...

दिल्लीत न‌ऊ शाळांमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी.बाॅम्ब शोधक यंत्रणा घटनास्थळी दाखल विद्यार्थी व पालकांन मध्ये चिंतेचे वातावरण

296
0

पुणे दिनांक १ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार दिल्ली मधील एकूण ८ ते ९ शाळांमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल अज्ञात व्यक्तीने पाठविला आहे.व या शाळा बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी दिल्यांने पालक व विद्यार्थी तसेच शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या शाळेत बाॅम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांचे बाॅम्ब शोधक यंत्रणा तसेच अग्निशमन दल पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे.तसेच या धमकी नंतर काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान या धमकी नंतर दिल्ली बाॅम्ब शोधक पथकाच्या वतीने शाळेची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.यात द्वारका येथील डीपीएस . मयूर विहार येथील मदर मेरी स्कूल.तसेच नवी दिल्ली येथील संस्कृती स्कूल.आदी हायप्रोफाइल स्कूलचा यात समावेश आहे.दरम्यान आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या शाळांमध्ये बाॅम्ब ठेवल्या बाबत माहिती देण्यात आली.नंतर बाॅम्ब शोधक पथक तसे अग्निशमन दलाचे जवान व पोलिस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.व शाळाची तपासणी करण्यात येत आहे.दरम्यान या शाळांना धमकीचा ईमेल आल्यानंतर पालक व विद्यार्थी तसेच शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.व भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलिस यंत्रणा धमकीचा ईमेल नेमका कोणी पाठविला या बाबत शोध घेत आहेत.

Previous articleपुण्यातून अपहरण केलेल्या सहा महिन्यांच्या बाळाची सोलापूरात तीन लाख रुपयांना विक्री.पुणे पोलिसांनी अपहरण करणाऱ्या टोळीच्या कर्नाटकातून आवळल्या मुसक्या
Next articleमुंबईतील भाभा हॉस्पिटलमध्ये पेशंडकडून नर्सला मारहाण.कर्मचा-यांकडून काम बंद आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here