Home क्राईम पिंपरी चिंचवड शहरात मर्सिडीज कार मध्ये २९ लाख ५० हजार रुपयांची रोकड...

    पिंपरी चिंचवड शहरात मर्सिडीज कार मध्ये २९ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली

    541
    0

    पिंपरी चिंचवड २ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे.दिनांक ७ में रोजी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.व निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतांनाच आज पिंपरी चिंचवड शहरात एका मर्सिडीज कार मध्ये २९ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली आहे.  त्यामुळे मुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाच्या सेटेस्टिक सर्विलांस टिमच्या वतीने निगडी येथील चेक पोस्टवर सदरची रोकड जप्त करण्यात आली आहे.दरम्यान मर्सिडीज या कारमधून एकूण २९ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.सदरची रोकड कोणांची आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावरील रोकड कोणत्याकारणांसाठी मर्सिडीज कार मधून घेऊन जात होते.? तसेच लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सदरची रक्कम ही मतदार यांना वाटपासाठी घेऊन जात होते का? या सर्व गोष्टीचा तपास आता निवडणूक आयोगाचे पथक व आयकर विभागाचे पथक तपास करीत आहेत.

    Previous articleमुंबईतील भाभा हॉस्पिटलमध्ये पेशंडकडून नर्सला मारहाण.कर्मचा-यांकडून काम बंद आंदोलन
    Next articleजेष्ठ नेते शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा जळगाव येथे अपघात

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here