Home राजकीय जेष्ठ नेते शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा जळगाव येथे अपघात

    जेष्ठ नेते शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा जळगाव येथे अपघात

    121
    0

    पुणे दिनांक ३ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी आप आपल्या उमेदवाराच्या साठी अनेक मतदारसंघात प्रचारा करीता व्यस्त आहेत.दरम्यान आज जळगावात जेष्ठ नेते शरद पवार हे उमेदवारांच्या प्रचारासाठी त्याचा ताफा जात सभास्थानी जात असताना ताफ्यातील एक वाहनाचा अपघात झाला असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे. त्याचा ताफा जळगाव येथील चोपडा येथून भुसावळकडे जात असताना हा अपघात झाला आहे.

    दरम्यान आज जेष्ठ नेते शरद पवार हे शुक्रवारी दिनांक ३ में रोजी जळगाव जिल्ह्यात दौ-यांवर आहेत.सदर दौ-या निमित्ताने पवार यांच्या वाहनाचा ताफा चोपडा वरुन भुसावळकडे जात असताना त्यांचा ताफा याला तालुक्यातील किनगावा जवळ पोहोचला . त्यावेळी अचानकपणे पवार यांच्या ताफ्यातील एक कार ही दुसऱ्या कारला जोरात धडकली.दरम्यान या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.पण वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

    Previous articleपिंपरी चिंचवड शहरात मर्सिडीज कार मध्ये २९ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली
    Next articleसंभाजीनगर येथे एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने ६६ प्रवाशांनी भरलेली बस अजिंठा घाटात उलटली

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here