Home क्राईम संभाजीनगर येथे एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने ६६ प्रवाशांनी भरलेली बस अजिंठा...

    संभाजीनगर येथे एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने ६६ प्रवाशांनी भरलेली बस अजिंठा घाटात उलटली

    107
    0

    पुणे दिनांक ३ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा घाटात ६६ प्रवाशांना घेऊन जाणा-या एसटी बसचे अचानकपणे ब्रेक फेल झाल्याने सदरची बस ही घाटात उलटून भीषण असा अपघात झाला आहे.या अपघातात बसमधील ७ ते ८ प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत अशी प्रथमदर्शनी सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

    दरम्यान या अपघाता नंतर एसटी बस पलटी झाल्यानंतर स्थानिक नागरिक व पोलिस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेऊन सर्व प्रवाशांना बाहेर काढले.व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान ही एसटी बस रावेर आगाराची असून ती रावेर वरुन पुण्याकडे येत असल्याचे समजते.दरम्यान ही बस अजिंठा घाटातून येत असताना अचानकपणे समोरच्या दिशेने एक ट्रक येत होता.त्यावेळी एसटी बसचे ब्रेक निकामी झाले.त्यामुळे ही बस घाटात उलटली या घटनेत एकूण ७ ते ८ प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.मात्र या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.

    Previous articleजेष्ठ नेते शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा जळगाव येथे अपघात
    Next articleआमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आरक्षणांची मर्यादा वाढविणार.राहुल गांधीची पुण्यात मोठी घोषणा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here