पुणे दिनांक ४ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार सुनेत्रा पवार यांच्य प्रचारार्थ उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या एकूण बारामतीत चार सभा होणार आहे.तर दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ जेष्ठ नेते शरद पवार हे दौंड तालुक्यातील वरवंड येथील बाजारतळावर सभा घेणार आहेत.ही सभा आज दुपारी दोन वाजता होणार आहे.या सभेला काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व ऊध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे युवा आघाडीचे नेते आदित्य ठाकरे व भास्कर जाधव तसेच अहिल्याबाई होळकर यांचे वंशज होळकर सहभागी होणार आहेत.