Home राजकीय आमदार रोहित पवारांना काका अजित पवार यांनी जामखेड मध्ये दिला धक्का! समर्थकांने...

    आमदार रोहित पवारांना काका अजित पवार यांनी जामखेड मध्ये दिला धक्का! समर्थकांने सोडली साथ अजित पवार गटात सहभागी

    324
    0

    पुणे दिनांक ४ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवारांना त्यांचे काका व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच धक्का दिला आहे.रोहित पवार यांचे कट्टर समर्थक व अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांनी रोहित पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात पक्ष प्रवेश केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.तर एवढेच काय तर संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते संपूर्ण महाराष्ट्रात सभांचा धुमधडाका उडवून दिला आहे. अशातच काका अजित पवार यांनी कर्जत जामखेड मध्ये आमदार रोहित पवारांना चांगलाच धक्का दिला आहे.

    दरम्यान कर्जत – जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक व अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांना आपल्या गटात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळविले आहे.शिंदे यांनी आज मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.दरम्यान अक्षय शिंदे हे पूर्वी पासून आमदार रोहित पवार यांच्या सोबत सक्रिय राजकारणात कार्यरत होते आता या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.आता शिंदे यांनी रोहित पवार यांची साथ सोडून अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

    Previous articleकोल्हापुरात जेलमधून आणखी दहा मोबाईल जप्त!
    Next articleआज बारामतीत अजित पवार तर दौंड मधील वरवंड येथे शरद पवारांची सभा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here