Home क्राईम कोल्हापुरात जेलमधून आणखी दहा मोबाईल जप्त!

  कोल्हापुरात जेलमधून आणखी दहा मोबाईल जप्त!

  139
  0

  पुणे दिनांक ४ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात मोबाईल फोन सापडण्यांचे कालचक्र सुरूच आहे. दरम्यान जेल प्रशासनाच्या वतीने कळंबा कारागृहात मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत पुन्हा एकदा १० मोबाईल फोन सापडले आहेत.त्यामुळे वारंवार प्रशासनाच्या वतीने मोहिम राब‌ऊन देखील पुन्हा एकदा दहा मोबाईल सापडल्याने आता जेल प्रशासनावर देखील अनेक स्तरांवरुन सवाल उपस्थित केले जात आहे.दरम्यान कोल्हापूर कळंबा जेलचे कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी जेलमध्ये शोधमोहीम हाती घेतली होती.मागील काही दिवसांपूर्वी देखील चक्क कारागृहात ७५ मोबाईल फोन आढळून आले होते.आता परत जेलमध्ये शोधमोहीम घेतली असता १० मोबाईल फोन सापडले आहेत.कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्याकडे कडक सुरक्षा व्यवस्था असून देखील हे मोबाईल फोन कसे पोहोचतात असा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान कारागृह प्रशासन पुन्हा अॅक्शन मोडवर आले आहे.

  Previous articleमावळचे सुपुत्र उद्योजक शिवाजी जाधव फाॅरवर्ड ब्लॉक कडून मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मतदारांना मिळाला तिसरा पर्याय
  Next articleआमदार रोहित पवारांना काका अजित पवार यांनी जामखेड मध्ये दिला धक्का! समर्थकांने सोडली साथ अजित पवार गटात सहभागी

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here