Home राजकीय ज्या गावच्या बोरी ,त्याच गावाच्या बाभळी असतात… जेष्ठ नेते शरद पवार यांचा...

  ज्या गावच्या बोरी ,त्याच गावाच्या बाभळी असतात… जेष्ठ नेते शरद पवार यांचा वरवंड येथील सभेत सज्जड दम

  230
  0

  पुणे दिनांक ४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज दौंड तालुक्यातील वरवंड येथे जेष्ठ नेते शरद पवार बोलत होते.यावेळी ते म्हणाले की आज माझ्यावर टीका करीत आहात.कधीकाळी तुम्ही माझ्या बरोबर काम केलं.राजकारण करा.पण कुणी राजकारणासाठी गरीब जनतेला त्रास देत असाल तर ज्या गावच्या बोरी.त्याच गावाच्या बाभळी असतात हे लक्षात ठेवा.असा सज्जड दम जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिला आहे.यावेळी पवार यांनी दौंड तालुक्यातील वरवंड येथे विरोधकांना चांगलाच सज्जड दम भरला आहे.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील जोरदारपणे टीका केली.

  दरम्यान यावेळी बोलताना पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठिक ठिकाणी जातात.तो त्यांचा अधिकार आहे.पण त्यांनी पंतप्रधान म्हणून मागील दहा वर्षात काय केलं हे त्यांनी सांगावे.पण काय काम केले हे सांगण्या ऐवजी राहुल गांधीवर टीका करत आहेत.प्रश्र्न समजावून घेण्यासाठी राहुल गांधी हे संपूर्ण देशभर फिरले.लोकांचे प्रश्न त्यांनी समजावून घेतले.आणि मोदी त्यांच्यावर शहजादा म्हणून टीका करत आहेत.देशासाठी त्यांच्या वडिलांनी व आजीनी बलीदान दिलं.त्यांची हत्या झाली याचं भान ठेवलं पाहिजे.पण पंतप्रधान व्यापक दुष्टीकोणातून विचार करत नाहीत.मोदी दिलेला शब्द पाळत नाही.अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

  Previous articleआज बारामतीत अजित पवार तर दौंड मधील वरवंड येथे शरद पवारांची सभा
  Next articleजम्मू -काश्मीर मध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here