पिंपरी -चिंचवड दिनांक ४ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे व रायगड जिल्ह्यांचा समावेश असलेला मावळ लोकसभा मतदारसंघातून जेष्ठ कामगार नेते शिवाजी जाधव हे ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लॉक या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे आता मावळ लोकसभा निवडणूकत आता तिंरगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मावळ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात दिला आहे. मावळ लोकसभा निवडणूकीत फाॅरवर्ड ब्लॉकचे उमेदवार शिवाजी जाधव यांना शेतकरी कामगार पक्ष.भारत राष्ट्र समिती पक्ष यांच्यासह मावळा संघटना.तसेच महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समिती.क्रांतिसूर्य सोशल फाउंडेशन आणि क्षेत्रिय मराठा फाऊंडेशन अशा वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.पाठिंबा मिळालेले सर्व पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून मावळ लोकसभा २०२४ च्या निवडणूकीत माक्षा निश्चितच विक्रमी मतांनी विजयी होईल असा विश्वास शिवाजी जाधव यांनी पिंपरी चिंचवड शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
दरम्यान मावळ लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.या भागातील शेतकरी व बेरोजगार कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.सध्या केंद्रांत असलेले मोदी सरकार मोठ्या प्रमाणावर कंपनीचे खासगीकरण करत आहेत.उद्योगधंदे परराज्यात चालले आहेत.मावळातील गडकिल्ल्यांसह पर्यटनाचा विकास खुटलेला आहे.मावळातील पवना बंदिस्त पाईपलाईनचा प्रश्न रखडला आहे.तसेच मावळातील दुर्गम भागात अजूनही रस्ते आणि वीज पूरवठा झाला नाही.सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात ऊभा आहे.त्यामुळे मावळातील जनता यावेळी माझ्या सारख्या भूमिपुत्रांच्या पाठीशी निश्र्चितपणे ऊभे राहून मला विक्रमी मतांनी विजयी करणार असा विश्वास शिवाजी जाधव यांनी यावेळी व्यक्त केला आहे.देशात सध्या मोदी आणि भाजपची हवा नसून देशातील मतदारात अंडर करंट हा वेगळाच आहे.मतदारातील हा अंडर करंट प्रस्थापितांच्या विरोधात जाणारा असल्याने ह्या निवडणूकीत. प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारा व्यतिरिक्त आम्ही एक पर्याय फाॅरवर्ड ब्लॉक च्या माध्यमातून दिला आहे.असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना शिवाजी जाधव म्हणाले की मावळातील २५ लाख मतदारात आम्ही या पूर्वी पोहोचलो असून पुढील दहा दिवसांत आम्ही प्रबळ स्पर्धक आणि दावेदार म्हणून मतदारा प्रर्यत पोहोचणार आहेत. असा विश्वास व्यक्त केला आहे.चिंचवड येथील पत्रकार परिषदेचे नियोजन आणि सूत्रसंचालन भारत राष्ट्र समिती पक्षाचे कोकण मुंबई विभागीय समन्वयक विजय मोहिते यांनी केले.या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे नेते चंद्रशेखर पाटील.मावळ युवा संघटनेच्या नेत्या रुपाली पाटील.भोसरी विधानसभा समन्वयक ( BRS) वाजीद सय्यद.पिंपरी विधानसभा समन्वयक ( BRS) सौ प्रफुल्ला मोतलिंग.तसेच क्रांतीसुर्य सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र देवकर यांच्यासह पक्ष संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.