पुणे दिनांक ५ ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून तसेच आज रविवार असल्याने सुपरसंडे आहे.बारामतीत लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार व लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार हे देखील बारामती येथे आहेत.दरम्यान जेष्ठ नेते शरद पवार यांचे कार्यकर्ते व अजित पवार यांचे कार्यकर्ते हे बारामती येथील भिगवण चौकात आमने – सामने आले . यावेळी काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.भिगवण चौकात शरद पवार यांच्या गटाची बाईक रॅली आली होती.त्याच वेळी अजित पवार यांचे कार्यकर्ते याच चौकात आले.दरम्यान दोन्ही गटांचे कार्यकर्ते हे आमने – सामने आले.यावेळी दोन्ही बाजुंने कार्यकर्ते यांनी तुफान घोषणा बाजी केली.यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक चकमकही झाली दरम्यान यावेळी पोलिसांनी 👮 त्वरित हस्तक्षेप केल्याने दोन्ही गटाच्या वतीने माघार घेण्यात आली.दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार एकंदरीत चांगलेच चित्र निर्माण झाले आहे.व याचे पडसाद आता कार्यकर्ते यांच्यात मध्ये पाहण्यास मिळत आहे.
Home राजकीय आज रविवार सुपरसंडे प्रचाराचा शेवटचा दिवस बारामतीमधील भिगवणचौकात राडा हायव्हाॅल्टेज ड्रामा!काका व...