पुणे दिनांक ५ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना व ७ एप्रिल रोजी मतदान होण्यापूर्वी आता अवैध पैसा 💸 प्रचंड प्रमाणावर बाहेर निघू लागला आहे.अशीच एक अपडेट हाती आली असून काल शनिवारी खामगाव चेक पोस्ट नाक्यावर पोलिसांनी 👮 तब्बल एका कारची झडती घेऊन एका लोखंडी पेटीतून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.यामुळे बीड जिल्हात एकच खळबळ उडाली आहे सदर कारवाई नंतर पोलिसांनी कार चालकाकडे या रोकड बाबत चैकशी केली आहे.
दरम्यान यावेळी पोलिसांना माहिती देताना संबंधित ही रक्कम द्वारकादास मंत्री बॅकेची असल्याची सांगितले आहे.पण या रोकड बाबत कार चालकाकडे आवश्यक असणारे कागदपत्रे मिळालेले नाही.आता ही रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.दरम्यान यावेळी कोणत्याही प्रकारचे बारकोड संबंधित कार चालकाकडे नसल्याने या रोकड बाबत पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.दरम्यान ही एक कोटीची रक्कम मतदार यांना वाटपासाठी आणली होती का? आता या दुष्टीकोणातून पोलिस व निवडणूक आयोगाच्या वतीने तपास सुरू आहे.