Home क्राईम “शापित समृद्धी महामार्गावर “आज सकाळी भीषण अपघातात तीनजण ठार.दोघेजण गंभीर रित्या जखमी

  “शापित समृद्धी महामार्गावर “आज सकाळी भीषण अपघातात तीनजण ठार.दोघेजण गंभीर रित्या जखमी

  718
  0

  पुणे दिनांक ५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)” शापित समृद्धी महामार्गावर” आज सकाळी भीषण असा अपघात झाला असल्याची अपडेट मिळत असून सदरचा अपघात हा मुंबई काॅरिडाॅरवरील चॅनल नंबर ३०४ येथे झाला आहे.या भीषण अशा अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी तातडीने संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपघातातील प्रवासी हे छत्तीसगड येथील असल्याचे समजते आहे.दरम्यान या अपघातात या वाहनाला जोरात धडक देऊन दुसरा वाहन चालक हा घटनास्थळावरुन फरार झाला आहे.महामार्ग पोलिस अज्ञात वाहनाच्या शोध घेत आहेत.

  दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.त्यांची नावे याप्रमाणे आहेत १) लताबाई पुरुषोत्तम मेहेर.२) मुकेश अनुज राम मेहेर.३) अत्माजा मुनोरबोद .अशी आहेत.दरम्यान समृद्धी महामार्ग झाल्या पासून या महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे.या महामार्गावर अनेक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे.यात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहे.परंतू या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.आता या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता या महामार्गावरुन प्रवास करायचा का नाही असा प्रश्न चिन्ह पडले आहे.तर अनेक प्रवासी या महामार्गाला ” शापित समृद्धी महामार्ग” म्हणू लागले आहेत.राज्य सरकारच्या वतीने या समृद्धी महामार्गावर अनेक तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शना नुसार आता उपाय योजना करण्याची काळाची गरज निर्माण झाली आहे.

  Previous articleमतदानापूर्वी बीड मध्ये कारमध्ये लोखंडी पेटीत सापडली एक कोटीची रोकड एकच खळबळ
  Next articleआज रविवार सुपरसंडे प्रचाराचा शेवटचा दिवस बारामतीमधील भिगवणचौकात राडा हायव्हाॅल्टेज ड्रामा!काका व पुतणे समर्थक आमने- सामने

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here