पुणे दिनांक ६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) रविवारी दिनांक ५ में रोजी रात्री उशिरा अमेठी मधील रायबरेली- सुलतानपूर महामार्गावर असलेल्या काॅग्रेस भवनाच्या बाहेर काही अज्ञात व्यक्तींनी गोंधळ घातला. त्यांनी काॅग्रेस भवनाच्या बाहेर असलेल्या वाहनांची तोडफोड करत अचानकपणे राडा घातला आहे.दरम्यान हा सर्व प्रकार रायबरेली – सुलतानपूर महामार्गावर घडल्यानंतर काॅग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न यावेळी केला.मात्र या राड्या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून परिस्थिती आटोक्यात आणली आहे.
दरम्यान यावेळी पोलिसांनी काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढताना काही कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या यंत्रणावर देखील गंभीरपणे आरोप केले आहे.दरम्यान सदरचे प्रकरण हे आटोक्यात येत नसल्याचे पाहून काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष व पदाधिकारी हे तातडीने घटनास्थळी पोहोचले.व त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली व त्यांना शांत केले आहे. दरम्यान घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक हे देखील ताडडीने घटनास्थळी दाखल झाले.आता या प्रकरणांचा तपास पोलीस करत आहे.