पुणे दिनांक ६ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना पुणे शहरातील भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील नेते गणेश बिडकर यांना धमकीचा फोन आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.हा प्रकार काल रविवारी रात्री घडला असून गणेश बिडकर यांनी या धमकी बाबत पुण्यातील लष्कर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील भाजप पक्षाचे नेते गणेश बिडकर यांना रविवारी रात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन केला.व २५ लाख रुपयांची खंडणी मागितली .व खंडणीची रक्कम २५ लाख रुपये न दिल्यास तुमचा व्हिडिओ व्हायरल करुन.तुमची राजकीय कारकीर्द उध्दवस्त करु अशी धमकी देण्यात आली आहे.सदरच्या धमकी नंतर बिडकर यांनी पुणे पोलिसांच्या लष्कर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून आता या प्रकरणाचा तपास पुणे खंडणी विरोधी पोलिस पथकाकडे दिला आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील भाजप पक्षाचे नेते गणेश बिडकर यांना व्हाट्सअॅपवर फोन करून २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.या सर्व गोष्टींचा विचार करून आता खंडणी विरोधी पथक तपास करीत आहेत.