Home राजकीय भोर येथील रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

  भोर येथील रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

  538
  0

  पुणे दिनांक ६ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मंगळवारी दिनांक ७ में रोजी बारामती लोकसभेची निवडणूकीसाठी मतदान होत आहे.दरम्यान लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदार हा म्हत्वाचा घटक असल्याने पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील विधानसभा मतदार संघातील रायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकातील कर्मचारी यांनी एक तास पायपीट केली आहे.

  दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथील मतदान साहित्य वाटप केंद्रव‌रुन आज मतदान पथके हे मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मतदान साहित्य वाटप केले.यावेळी  कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियाबाबत माहिती देण्यात आली.भोर येथील सर्वप्रथम रायरेश्वर पठारावर असलेल्या मतदान केंद्रांसाठी प्रथम साहित्य वाटप करण्यात आले.या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी कर्मचारी यांना लोखंडी शिडीच्या सहाय्याने पोहोचावे लागले.व पुढे या मतदान केंद्रावर जाण्यासाठी एक तास पायपीट करावी लागली आहे.

  Previous articleमुंबईतील हिंदुजा हॉस्पिटला लागली 🔥 आग
  Next articleआज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here