पुणे दिनांक ६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई येथील खार भागात असलेल्या हिंदुजा हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर आग लागली आहे.आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून ते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करून सदरची आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान हाॅस्पीटलमध्ये आग कशामुळे लागली यांची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.पण बहुतेक शाॅकसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्यान या हाॅस्पीटलमध्ये लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून समजत आहे.