Home क्राईम अहमदनगर जिल्ह्यातील विसापूर जेलमधून पुण्यातील कैदी फरार बेलवंडी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा...

  अहमदनगर जिल्ह्यातील विसापूर जेलमधून पुण्यातील कैदी फरार बेलवंडी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

  340
  0

  पुणे दिनांक ७ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जेल मधून पुण्यातील एका कैद्याने धूम ठोकली आहे.या बाबत विसापूर जेल प्रशासनाच्या वतीने बेलवंडी पोलिस स्टेशन मध्ये फरार झालेल्या कैद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे खुप जुने ब्रिटिश काळापासून खुले जेल आहे.दरम्यान या खुल्या जेलमध्ये अनेक कैदी ज्यांना न्यायालयाने शिक्षा भोगत असलेले कैदी राहतात. दिनांक ५ में रविवारी या कैद्यांने रात्री १२ वाजण्याच्या सुमारास जेल मधून धूम ठोकली आहे.

  दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जेल मध्ये शिक्षा भोगत असलेला कैदी नंबर ४०७ अमित उर्फ राजू राजपूत ( वय २९ रा.कावळे वस्ती डोंगरगाव ता.मावळ जिल्हा पुणे) हा रविवारी बाथरूमला जातो असे सांगून जेल मधून पळून गेला आहे.कारागृह प्रशासनाच्या वतीने शोध घेऊन तो कुठेज मिळाला नाही.त्यानंतर कर्मचारी नंदकुमार शिंदे यांनी या प्रकरणी बेलंवडी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी राजपूत याच्या विरोधात भा.दा.वी.कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

  Previous articleपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आचारसंहिता भंग गुन्हा दाखल
  Next articleकर्नाटक पोलिसांची जेपी नड्डा यांना नोटीस.सात दिवसांत पोलिस ठाण्यात हजर व्हा

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here