Home राजकीय आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात

    आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात

    450
    0

    पुणे दिनांक ७ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण भारतभर आज तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात सकाळी सात वाजल्यापासून झाली आहे.आज देशभरात एकूण ९३ जागां साठी मतदान होत आहे.यासाठी सर्वच मतदार संघावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आज ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण १.८५ लाख मतदान केंद्रावर मतदानांची प्रक्रिया सुरू झाली आहे.या आजच्या तिसऱ्या टप्प्यात ८.८५ कोटी पुरुष मतदार तर ८.३९ कोटी महिला मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.यात आज अनेक दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

    दरम्यान आज महाराष्ट्रातील या मतदारसंघातात तिसऱ्या टप्प्यात एकूण ११ ठिकाणी मतदान होणार आहे.यात १) रायगड.२) बारामती.३)माढा ४) धाराशिव.५) लातूर ६) सोलापूर.७) सांगली ८) सातारा ९) रत्नागिरी – सिंधुदुर्ग १०) कोल्हापूर तर ११) हातकणंगले.हे मतदार संघ आहेत.

    Previous articleभोर येथील रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास
    Next articleबारामती लोकसभा मतदारसंघात पोलिस बंदोबस्तात पैशाचा पाऊस.व्हिडिओ शेअर करत रोहित पवार यांचा गंभीर आरोप

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here