Home राजकीय आमदार दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ.सुप्रिया सुळेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

  आमदार दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ.सुप्रिया सुळेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

  221
  0

  पुणे दिनांक ७ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी तेथील मतदारांना दमदाटी केल्यानंतर आता नवीन वाद उफाळून आला आहे.दरम्यान आमदार दत्ता भरणेंचा हा व्हिडिओ पोस्ट करत आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत.यामुळे आता मतदान दरम्यान राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.दरम्यान या दमदाटी नंतर बारामती लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.त्यामुळे दत्ता भरणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.दरम्यान या सर्व प्रकारानंतर आमदार दत्ता भरणे हे म्हणाले की.मी तेथे कार्यकर्ते हे एकमेकांशी वाद घालत होते.म्हणून मी त्यांची समजूत घालून त्यांचा वाद मिटवत होतो मी कोणत्याही मतदारांना दमदाटी करत नव्हतो असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

  Previous articleबारामती लोकसभा मतदारसंघात पोलिस बंदोबस्तात पैशाचा पाऊस.व्हिडिओ शेअर करत रोहित पवार यांचा गंभीर आरोप
  Next articleहातकणंगले मध्ये एका मतदान केंद्रावर शिंदे व ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांन मध्ये जोरदार राडा

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here