Home क्राईम धाराशिवमधील भूम तालुक्यातील मतदान केंद्रावर एकावर 🗡️ चाकू हल्ल्यात एकाची हत्या तीनजण...

    धाराशिवमधील भूम तालुक्यातील मतदान केंद्रावर एकावर 🗡️ चाकू हल्ल्यात एकाची हत्या तीनजण गंभीर रित्या जखमी

    466
    0

    पुणे दिनांक ७ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज) आज महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात लोकसभा साठी एकूण ११ जागांवर मतदान होत असतांनाच धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या गावात एक खळबळजनक घटना घडली आहे.राजकिय वादातून एकावर 🗡️ चाकू हल्ल्या करण्यात आला आहे.यात त्यांचा मृत्यू झाला असून दरम्यान या चाकू हल्ल्यात अन्य तीनजण हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान सदरची हत्या ही राजकीय वादातून झाली आहे.त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीला गालबोट लागले आहे.या भागातील प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान अधी दोन गटात वाद निर्माण झाला व त्यांचे पर्यवसन चाकू हल्ल्यात झाले.यात एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य तीनजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    Previous articleहातकणंगले मध्ये एका मतदान केंद्रावर शिंदे व ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांन मध्ये जोरदार राडा
    Next articleमाढा लोकसभा मतदारसंघातील सांगोल्यात EVM पेटवण्याचा प्रयत्न

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here