पुणे दिनांक ७ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बारामती लोकसभा मतदारसंघात पोलिस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.दरम्यान या बाबत आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडियावर काही व्हिडिओ टाकत गंभीर असा आरोप केला आहे.बारामती लोकसभा मतदारसंघात मतदार यांना पैसे वाटप सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.त्या बाबतचे व्हिडिओ देखील शेअर केले आहे.
दरम्यान सदरचे पैसे वाटप करण्यासाठी भोर येथील अजितदादा मित्र मंडळाचा पदाधिकारी व मावळ तालुक्यातील कार्यकर्ते यांचा समावेश असल्याचा दावा देखील रोहित पवार यांनी केला आहे.तसेच यासाठी तुम्हाला पाहिजे होती का वाय Y सुरक्षा? असा खोचक टोला देखील रोहित पवार यांनी पार्थ पवार यांना लगावला आहे.तसेच आमदार रोहित पवार यांनी पैसे वाटपचा व्हिडिओ त्यांच्या X अकाउंटवर शेयर केले आहे. दरम्यान यावेळी आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार यांच्यावर टीका देखील केली आहे.आता आमदार रोहित पवार यांच्या आरोपाला काका अजित पवार काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे एकूण ११ मतदार संघात होत आहे.त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही.अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.ते यावेळी म्हणाले की.ही गावकीची व भावकीची निवडणूक नाही.ही देशाच्या पुढील पाच वर्षांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.दरम्यान काका अजित पवार यांनी आमदार पुतण्या रोहित पवार यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.