Home क्राईम इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी अत्याचार

    इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी अत्याचार

    पुणे दिनांक ९ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील लोणीकंद भागात एका युवकाने मुलीला आपल्या जाळ्यात ओढून तसेच इंस्टाग्रामवर ओळख झाल्याचा फायदा घेऊन तिचे फोटो काढून सदरचे फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुणे येथील लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.दरम्यान या घटने बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी व पीडित मुलगी दोघेही जण पुण्यात शिक्षण घेत असून या दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली.नंतर मुलीला या तरुणाने आपल्या जाळ्यात ओढले.दोघांचे बोलणे व्हायचे दरम्यान या तरुणाने मुलीला भेटायला बोलावले व संधीचा फायदा घेऊन तिचे फोटो काढले.व त्या नंतर सदरचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

    हा सर्व प्रकार पुण्यातील लोणीकंद भागात ७ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत घडला.दरम्यान दिनांक ४ एप्रिलला संबंधित तरुणाने या पीडित मुलीला जबरदस्ती करून त्याच्या कारमध्ये बसवून खराडी भागातील आयटी पार्क येथील मोकळ्या जागेतील मैदानात नेले.व त्या ठिकाणी गाडीत तिच्या सोबत असभ्य असे वर्तन करुन तिचे अश्लील फोटो काढले.यानंतर पीडित मुलीने लोणीकंद पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी अभि कांबळे याच्यावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Previous articleकर्नाटक पोलिसांची जेपी नड्डा यांना नोटीस.सात दिवसांत पोलिस ठाण्यात हजर व्हा
    Next articleपुण्यात भरदिवसा सराफांचे लक्ष विचलित करुन २५ लाखांचे सोने लंपास

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here