पुणे दिनांक ९ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ घडली होती.सकाळी सकाळी भरदिवसा महर्षी शिंदे पुलावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या दिनांक २० ऑगस्ट २०१३ ला गोळ्या झाडून करण्यात आली होती. दरम्यान तब्बल दहा वर्षांनंतर या हत्याचा निकाल उद्या दिनांक १० में रोजी देण्यात येणार आहे.सदरच्या खटल्यात एकूण पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे.