Home क्राईम पिंपरी चिंचवड येथील डी वाय पाटील काॅलेजच्या मध्ये कोयत्याने वार

  पिंपरी चिंचवड येथील डी वाय पाटील काॅलेजच्या मध्ये कोयत्याने वार

  317
  0

  पिंपरी चिंचवड दिनांक ९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शिक्षणाच्या माहेर घरात पिंपरी चिंचवड येथील डी वाय पाटील काॅलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी किरकोळ कारणावरून कोयता उगारला.कारण काय तर एकमेकांकडे पाहिले व मोबाईल फोनवर मोठ मोठ्याने बोलत असल्याच्या शिल्लक गोष्टींवरुन हा सर्व प्रकार घडला अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.ही घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

  दरम्यान यानंतर एकाने अचानकपणे कोयता उगारल्याने विद्यार्थ्यांनमध्ये डी वाया पाटील काॅलेजच्या कॅम्पस मध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान इंजिनिअरींग काॅलेजच्या तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे.काॅलेज कॅम्पस मध्ये हे विद्यार्थी पेपर देऊन घरी जात होते.त्यावेळी हा प्रकार घडला आहे.दरम्यान एका गटातील एकाने तु फोन वर मोठ्याने का बोलतो म्हणून दुसऱ्या विद्यार्थ्यांवर कोयता उगारला सुदैवाने यात विद्यार्थ्यांला कोणत्याही प्रकारची दुःखापत झाली नाही. दरम्यान या घटने बाबत दिघी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व पुढील कारवाई सुरू आहे.

  Previous articleआज महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत वादळीवाऱ्यासह पाऊस
  Next articleलोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्थेचा दीपक सिंगला यांच्याकडून आढावा

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here