Home क्राईम पुण्यात भरदिवसा सराफांचे लक्ष विचलित करुन २५ लाखांचे सोने लंपास

  पुण्यात भरदिवसा सराफांचे लक्ष विचलित करुन २५ लाखांचे सोने लंपास

  722
  0

  पुणे दिनांक ९ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील येरवडा येथील एका ज्वेलरीच्या दुकानात भरदिवसा सराफाचे लक्ष विचलित करुन २५ लाग रुपयांच्या दागिन्यांवर ✋ हात साफ करुन सराफाला चुना लावल्याची घटना घडली आहे.सदरची घटना ही पुण्यातील येरवडा येथील महावीर ज्वेलर्स या दुकानात घडली आहे.या चोरीची घटना ही सी सी टिव्हीच्या 📷 कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.

  दरम्यान या चोरी प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.दरम्यान या चोरीच्या घटनेत सराफाचे लक्ष विचलित करुन चोरट्यांनी हात साफ केला आहे.यात ३७३ ग्रॅमचे सोन्याचे दागिने पळविले आहे.ही चोरीची घटना सी सी टिव्ही फुटेज मध्ये कैद झालेली आहे.या सी सी टिव्ही फुटेज मध्ये दुकानात एकूण ४ ते ५ ग्राहक उपस्थित असलेचे एकंदरीत दिसत आहे.

  Previous articleइन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी अत्याचार
  Next articleदहा वर्षांनंतर डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाचा निकाल उद्या

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here