Home क्राईम आज पहाटे मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात तीन वाहनांच्या अपघातात तीन...

  आज पहाटे मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात तीन वाहनांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर आठजण जखमी

  415
  0

  पुणे दिनांक १० मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात आज चार वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र असा अपघात झाला आहे.पाईप घेऊन जाणारा ट्रक व पोल्ट्री फार्मच्या कोंबड्या घेऊन जाणारा टेम्पो व कार अशा एकूण तीन वाहनांचा अपघात झाला आहे.ही वाहने एकमेकांवर जोरात आदळल्याने या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य आठजण हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.यातील जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले असून यात चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

  दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक १० मे शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील बोरघाटात या वाहनांचा अपघात झाला आहे.यात ट्रक टेम्पो व कार ही तिन्ही वाहने महामार्गावरील लेनवर आडवी झाली आहेत.यात तीन जणांचा घटना स्थळीच मृत्यू झाला आहे तर अन्य आठजण हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.त्यांना उपचारासाठी कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातामधील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.सदर अपघाता नंतर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती व वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.पण अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.

  Previous articleलोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्थेचा दीपक सिंगला यांच्याकडून आढावा
  Next articleडॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणांत दोघांना जन्मठेपेची शिक्षा.तर तीन जणांची निर्दोष सुटका

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here