Home राजकीय आज चौथ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार.पुण्यात भाजप .काॅग्रेस.राष्ट्रवादी पवार गटाच्या उमेदवारांसाठी...

    आज चौथ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार.पुण्यात भाजप .काॅग्रेस.राष्ट्रवादी पवार गटाच्या उमेदवारांसाठी अनेक दिग्गज नेते पुण्यात

    498
    0

    पुणे दिनांक ११ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान महाराष्ट्रात ११ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज शनिवारी सहा वाजता थंडवतील व दिनांक १३ मे रोजी सोमवारी मतदान होईल.यात पुणे.मावळ . शिरूर.अहमदनगर.शिर्डी. छत्रपती संभाजीनगर.नंदुरबार.जळगाव.रावेर . जालना.या ठिकाणी प्रचाराची सांगता सभेचा धडाका पाहण्यास मिळणार आहे.या चौथ्या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

    दरम्यान पुणे लोकसभेची निवडणूक आता रंगत वाढू लागली आहे.त्या करीता भाजपाकडून पुण्याचा गड ताब्यात ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी निवडणूकीचे संपूर्ण सूत्र आपल्या ताब्यात घेतले आहे.फडणवीस हे पुणे मुक्कामी आहेत.भाजपच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांची मोहोळ यांच्या साठी सांगता सभा होणार आहे.तसेच ते पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालाप होणार आहे.दरम्यान शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या करीता हडपसर येथे जेष्ठ नेते शरद पवार व युवा नेते आदित्य ठाकरे यांची एकत्रित सभा होणार आहे.तर मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या करीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिंपरी चिंचवड येथे रोड शो होणार आहे.दरम्यान पुण्यातील काॅग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांचा रोड शो होणार आहे.शिरुर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीन वाजता खेड येथे सांगता सभा घेणार आहे.तर अमोल कोल्हे यांच्या साठी जयंत पाटील हे नारायणगावा मध्ये सांगता सभा घेणार आहे.आज सायंकाळी सहा वाजता प्रकाराच्या तोफा थंडावणार आहे.

    Previous articleपुण्यातील एनडीए भागात आढळला बाॅम्ब.एकच खळबळ
    Next articleसंभाजीनगर मध्ये ‘मनसे दोनशे ‘अशी ठाकरे गटाकडून तुफान घोषणाबाजी दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here