Home क्राईम पुण्यातील एनडीए भागात आढळला बाॅम्ब.एकच खळबळ

  पुण्यातील एनडीए भागात आढळला बाॅम्ब.एकच खळबळ

  382
  0
  पुणे दिनांक ११ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील एनडीए भागात एका ठिकाणी खोदकाम सुरू करत असताना बाॅम्ब आढळला आहे.दरम्यान बाॅम्ब आढळून आल्या नंतर खोदकाम करणा-या कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.व एनडीए भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या भागात बाॅम्ब आढळून आल्या नंतर बीडीएस बाॅम्ब शोधक पथक आणि पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.बीडीएस बाॅम्ब शोधक पथकाने बाॅम्ब निकामी केला असून तो नष्ट केला आहे.यानंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला.दरम्यान एनडीए या भागात एका पुलाचे बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना हा बाॅम्ब आढळून आला होता.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.
  Previous articleनवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ तेलंगणात गुन्हा दाखल
  Next articleआज चौथ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार.पुण्यात भाजप .काॅग्रेस.राष्ट्रवादी पवार गटाच्या उमेदवारांसाठी अनेक दिग्गज नेते पुण्यात

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here