Home राजकीय संभाजीनगर मध्ये ‘मनसे दोनशे ‘अशी ठाकरे गटाकडून तुफान घोषणाबाजी दोन्ही गटांचे कार्यकर्ते...

    संभाजीनगर मध्ये ‘मनसे दोनशे ‘अशी ठाकरे गटाकडून तुफान घोषणाबाजी दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने

    578
    0

    पुणे दिनांक ११मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार हा सायंकाळी सहा वाजेपर्यंतच आहे.याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौकात मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले.याच वेळी उध्दव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून दोनशे रुपयांच्या नोटा मनसे कार्यकर्त्यांना दाखविल्या जात आहेत.दरम्यान यावेळी मनसेकडून पैसे घेऊन प्रचार केला जात आहे.तसेच मनसेची आजची स्थिती ही वीस रुपयांची झाली आहे.असा टोलाच एकंदरीत ठाकरे गटाकडून लगावण्यात आला आहे.दरम्यान यावेळी उध्दव ठाकरे गटाच्या वतीने ‘ मनसे दोनशे ‘ अशी संभाजीनगर येथील क्रांती चौकात प्रचंड प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली आहे.यावेळी उध्दव ठाकरे गटाचे कार्यकर्ते व मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.

    Previous articleआज चौथ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार.पुण्यात भाजप .काॅग्रेस.राष्ट्रवादी पवार गटाच्या उमेदवारांसाठी अनेक दिग्गज नेते पुण्यात
    Next articleपुण्यातील सिंहगडरोडवरील डॉक्टरच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तीन जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या मुद्देमाल जप्त

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here