Home क्राईम घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळले १५ ते २० जणांना बाहेर काढले

  घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळले १५ ते २० जणांना बाहेर काढले

  230
  0

  पुणे दिनांक १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरात पाऊस सुरू झाला असून यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. वादाळामुळे मुंबईतील घाटकोपर पूर्व येथे पेट्रोल पंपावर एक भल्ले मोठे होर्डिंग्ज कोसळले आहे.या होर्डिंग्जच्या खाली ७० ते ८० लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान या ठिकाणी बचाव पथक व पोलिस कर्मचारी दाखल झाले असून बचाव कार्यास सुरुवात केली आहे.

  दरम्यान या होर्डिंग्ज खाली अडकलेल्या एकूण १५ ते २० लोकांना बचाव पथकाने बाहेर काढले असून त्यांना तातडीने उपचारासाठी राजेवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या कोसळलेल्या होर्डिंग्जच्या खाली जवळपास एकूण ८० वाहने दबली गेली आहेत.या दबलेल्या वाहनांमधून लोक वाचवा म्हणून नागरिक व बचावकार्य पथक तसेच पोलिस यांना आम्हाला बाहेर काढा म्हणून आवाज देत आहे. दरम्यान घटनास्थळा जवळ पेट्रोल पंप असल्याने या ठिकाणी 🔥 आग लागू शकते म्हणून बचाव कार्य करतांना कारचा वापर करता येत नाही.परिणामी बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे.तसेच अनेकजण हे या होर्डिंग्जच्या खाली अडकले आहेत.

  Previous articleमुंबईत वादळी वाऱ्यामुळे मध्य रेल्वे सेवा ठप्प; नोकरदारांचे हाल
  Next article‘मुंब‌ईतील होर्डिंग्ज दुर्घटना ३५ जणांना बाहेर काढले.मी लवकरच घटनास्थळी जणार’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here