पुणे दिनांक १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज महाराष्ट्रातील एकूण ११ जागांवर लोकसभा निवडणूक साठी दिनांक १३ मे पासून सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे.यात या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होत आहे.१) मावळ शिंदे गट.शिवसेना श्रीरंग बारणे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे.पुणे- काॅग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर व भारतीय जनता पार्टीचे मुरलीधर मोहोळ व वंचित कडून वसंत मोरे.शिरुर.शरद पवार गटाचे अमोल कोल्हे.व अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पाटील.अहमदनगर.भारतीय जनता पार्टीचे सुजय विखे विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके.
दरम्यान नंदुरबार येथून भारतीय जनता पार्टीच्या हिना गावित विरुध्द काॅग्रेस पक्षाच्या वतीने गोवाल पडवी . जळगाव.महायुतीकडुन स्मिता वाघ विरुद्ध महाविकास आघाडीतून करण पाटील पवार.जालना येथून भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे विरुद्ध काॅग्रेस पक्षाचे कल्याण काळे.तर रावेर येथून भारतीय जनता पार्टीच्या रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील.छत्रपती संभाजीनगर येथून एमआयएम चे इम्तियाज जलील.उध्वव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तर शिंदे गटाचे शिवसेनेचे संदीपान भुमरे.यांच्यात प्रमुख लढती होणार आहेत.