पुणे दिनांक १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत तुफानी वादळवा-यासह पाऊस पाऊस सुरू झाला आहे.त्यामुळे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे.परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.त्यामुळे संध्याकाळी कामा वरुन पुन्हा घरी परतणाऱ्या चाकरमानी व कामगार यांचे प्रचंड प्रमाणावर हाल झाले आहेत.दरम्यान या अवकाळी पावसाने ठाणे.कल्याण.बदलापूर.या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या वाहतूक व्यवस्थेवर परीणाम झाला आहे.
दरम्यान या पावसामुळे कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट रेल्वे लोकलचा मार्ग बदलण्यात आला आहे.या रेल्वे लोकल कळवा मुंब्रा रेल्वे स्टेशनवर थांबणार आहेत. दरम्यान मुंबई व नवी मुंबई मध्ये सोसाट्याच्या वादळ वा-यासह पाऊस कोसळत आहे.अचानकपणे आलेल्या या अवकाळी पावसामुळे रेल्वे वाहतूक व्यवस्था पुर्णपणे मंदावली आहे.त्यामुळे चाकरमानी यांचे प्रचंड प्रमाणावर हाल झाले आहे.दरम्यान रेल्वे स्टेशनवर चाकरमानी व प्रवासी यांची प्रचंड गर्दी झाली आहे.आज झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे रेल्वे वाहतूक व्यवस्था एकंदरीत ठप्प झाली आहे.