Home क्राईम घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेतील रेस्कू ऑपरेशन करतांना पेट्रोल पंपाला 🔥 आग .चार...

    घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेतील रेस्कू ऑपरेशन करतांना पेट्रोल पंपाला 🔥 आग .चार मृतदेह सापडले मृतांची संख्या १८ वर पोहोचली

    472
    0

    पुणे दिनांक १५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील घाटकोपर पूर्व येथे छेडानगर भागात जाहिरातीचे मोठे होर्डिंग्ज कोसळून मोठी दुर्घटना घडली होती.दरम्यान दुर्घटना होऊन तब्बल ४० तास झाले असून अजूनही या ठिकाणी रेस्कू ऑपरेशन व बचावकार्य सुरू आहे.दरम्यान हे काम सुरू असताना आज बुधवार सकाळी पेट्रोल पंपाला 🔥 आग लागली त्यामुळे बचाव पथकाची एकच तारांबळ उडाली होती. लागलेली आग ही अग्निशमन दलाच्या जवानांनी दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले व पुन्हा एकदा काम सुरू झाले.यात मलब्याखालून आज सकाळी पुन्हा चार मृतदेह काढण्यात आले आहे.त्यांची नावे अद्याप समजू शकलेले नाहीत.

    दरम्यान घटनास्थळाचा परिसर मुंबई पोलिसांनी संपूर्ण पुणे सील केला आहे.दुर्घटना होऊन ४० तास होऊन देखील बचावकार्य सुरू आहे.याठिकाणी तब्बल ६५ अग्निशमन दलाच्या जवान हे २० मशीन द्वारे मलबार हटवण्याचे काम रात्रंदिवस करत आहेत.दरम्यान आज या मलब्यातील मोठे लोखंड हे कटरच्या सहाय्याने कापत असतांनाच अचानकपणे आग 🔥 लागली होती.सदरची आग अग्निशमन दलाच्या जवानांनी दहा मिनिटात आटोक्यात आणली व नंतर पुन्हा या ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे.या ठिकाणी मलब्याखाली वाहने अडकून पडली आहेत.ती काढण्याचे काम सुरू आहे.एकूण आतापर्यंत ८९ जणांना रेस्कू करण्यात आले आहे.अजून या ठिकाणी काही वाहने हे या होर्डिंग्जच्या मलब्याखाली बदल्यांचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.आज येथून मलब्याखाली दबलेली एकूण चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.ते मृतदेह हे राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले असून.अद्याप त्यांची नावे समजलेली नाहीत त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.असे राजावाडी रुग्णालयातील प्रकाश वाणी यांनी सांगितले आहे.आतापर्यत या दुर्घटनेत मृतांची संख्या ही १४ वरुन १८ झाली आहे.दरम्यान यात अजून देखील काही मृतदेह आढळण्याची शक्यता आहे.कारण मलब्याखाली अजून काही वाहने ही गाडली गेली आहे.दरम्यान या ठिकाणी पेट्रोल पंप व सीएनजी पंप असल्याने बचाव पथकाला कट्टरचा उपयोग करता येत नाही.व लोखंडी मलबार असल्याने ते कापूनच हटवण्यात येत असल्याने रेस्कू टीमला मोठ्या प्रमाणावर अडचणीचे होत आहे.परिणामी मलबार हटवण्यात वेळ लागत आहे.

    Previous articleघाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींचा खर्च राज्य सरकार करणार दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
    Next articleलातूरमध्ये परवानाधारक जुगार कल्बवर पोलिसांचा छापा.२ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त जुगार खेळणाऱ्या ७४ जणांच्या आवळल्या मुसक्या

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here