Home राजकीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत भव्य रोड शो.सगळीकडे गर्दीच गर्दी!

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत भव्य रोड शो.सगळीकडे गर्दीच गर्दी!

  268
  0

  पुणे दिनांक १५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य रोड शोला सुरुवात झाली आहे.दरम्यान पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिक हे घराबाहेर पडले आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सायंकाळी मुंबईत आले आहेत.याच वेळी प्रचार झाल्यानंतर त्यांचा भव्य असा रोड शो होता आहे.यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत.

  दरम्यान सदरचा रोडशो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी नागरिकांनी घाटकोपर ते मुलुंड दरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.या भागातील सर्व रोड तुफान गर्दीने खचाखच भरला होता.तसेच रोडशो मध्ये गाड्यांचा मोठा ताफा देखील होता.तसेच या रोडशो मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांन बरोबर मित्रपक्ष शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.यात महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

  Previous articleसमता सहकारी बँक आर्थिक फसवणूक गुन्ह्यातील १७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींच्या सीआयडीने आवळल्या मुसक्या
  Next articleपुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here