पुणे दिनांक १५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात लोकसभा निकालापूर्वीच विचारांचे बॅनर वाॅर सुरू झाले आहेत.दरम्यान दोन दिवसांपूर्वी सनी निम्हण यांनी ” कर्वे रोड…ते कर्तव्य पंथ !” असे लोकसभा भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर लावले होते.त्या बॅनरला प्रतिउत्तर म्हणून काॅग्रेस चे अमितभाऊ आबा बागुल आणि मित्र परिवाराकडून पुण्यातील सारसबाग भागात आघाडीच्या विजयी उमेदवारांच्या विजायाचे बॅनर झळकवण्यात आले आहे.या बॅनरवर रवींद्र धंगेकर.अमोल कोल्हे.सुप्रिया सुळे.यांचा ‘खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ‘ असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे.दरम्यान मतदानाच्या दिवशीच सनी निम्हण यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर लावले होते. आता त्या बॅनरला प्रतिउत्तर म्हणून अमित बागल यांनी सारसबाग येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे विजायाचे बॅनर लावले आहे.एकंदरीत लोकसभा निकालापूर्वीच पुण्यात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात विजायाचे बॅनर वाॅर रंगले आहे.