पुणे दिनांक १५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार लातूर जिल्ह्यातील तांबळा शिवरात परवानाधारक असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास छापेमारी करून मोठी कारवाई केली आहे.यात नियम तोडून जुगार खेळणाऱ्या एकूण ७४ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. यात महाराष्ट्र.तेलंगणा.कर्नाटक.व आंध्रा प्रदेश या चार राज्यांतील जुगारींचा समावेश आहे.यात लातूर पोलिसांनी तब्बल २ कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या धडक कारवाई मुळे बेकायदेशीर रित्या जुगार अड्डा चालविणां-या मध्ये आता एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार लातूर जिल्ह्यातील तांबाळा शिवारात असलेल्या परवानाधारक जुगार क्लबवर लातूर जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा सोबत घेऊन रात्री एक वाजण्याच्या सुमारास या क्लबवर छापेमारी केली.या वेळी सदर क्लबवर नियम धाब्यावर बसवून जुगार खेळणाऱ्या महाराष्ट्र.कर्नाटक.तेलंगण.व आंध्रा प्रदेश या चार राज्यांतील एकूण ७४ जणांच्या मुसक्या पोलिसांनी 👮 आवळल्या आहेत.व लातूर जिल्ह्यात औराद-शहाजानी पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती लातूरचे सहाय्यक पोलिस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी माहिती दिली आहे.या कारवाईत तब्बल २ कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान 👮 पोलिसांच्या या कारवाईमुळे लातूर शहर व जिल्ह्यातील अनेक बेकायदेशीर रित्या जुगार क्लब चालविणां-याचे एकंदरीत ढाबे दणाणले आहेत.ही लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.