Home क्राईम समता सहकारी बँक आर्थिक फसवणूक गुन्ह्यातील १७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींच्या सीआयडीने...

    समता सहकारी बँक आर्थिक फसवणूक गुन्ह्यातील १७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींच्या सीआयडीने आवळल्या मुसक्या

    270
    0

    पुणे दिनांक १५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नागपूर येथील समता सहकारी बँक येथील आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यातील मागील १७ वर्षांपासून फरार असलेल्या व सीआयडीला गुंगारा देणा-या आरोपींच्या सीआयडीने मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान सदरच्या फसवणूक प्रकरणी सीआयडीने दिलेली माहिती अशी की.नागपूर येथील सिताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा र.नं.३२८/२००७ भा.दा.वी.कलम ४०६.४०८.४०९.४६७.४६८.४७१. ४२०.२०१.१२०.( ब) १०९.३४.सह कलम‌ ३.४.एम पी.आय.डी.व ६५.आयटी कलमा प्रमाणे.नागपूर येथील समता सहकारी बँक मधील विविध कर्मचारी व अधिकारी बॅंकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष संचालक मंडळ कर्जदार आरोपीत व अमन हेमानी तसेच राजश्री हेमाणी यांनी सन १९९७ ते २००७ या कालावधीत अपसात संगनमत करून बॅकेचे खातेदार व बॅकेचे गुंतवणूकदार यांचे १४५.६० कोटी रुपयांचा अपहार केला म्हणून एकूण ५७ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्याचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने नागपूर येथे सुरू आहे.

    दरम्यान नमूद गुन्ह्यातील आरोपी विजयकुमार रामचंद्र दायमा हा सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून स्वतः चे अस्तित्व लपवून पुणे.मुंब‌ई.नागपूर तसेच तेलंगणा राज्य येथे राहत होता.याच्या नातेवाईकांनकडे शोध घेऊन देखील तो मिळत नव्हता.हा आरोपी बॅंकेचा कर्जदार असताना त्यांने समता बॅंकेकडून कोणत्याही प्रकारचे तारण सिक्यूरिटी न देता बिल्स सूट सुविधा प्राप्त करुन सदर कर्जाची फेड न करता बॅंकेतील व्यावास्थापक.व इतर यांना हाताशी धरून बॅकेतून कपट बुद्धीने आर्थिक प्राप्ती करुन फसवणूक केलेली आहे.त्याच्या विरुद्ध मा.विषेश न्यायालयाने एनडीडब्लू वाॅरंट व जाहिरनामे प्रसिद्ध करुन देखील नमूद आरोपी मा.न्यायालयात हजर न राहता स्वतःचे अस्तित्व लपवून फरार होता.दरम्यान मागील १७ वर्षांपासून सदर आरोपीचा शोध घेण्यात येत होता.सदरच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नामें विजयकुमार रामचंद्र दायमा ( रा.फेअर व्हिवा सोसायटी.गोदावरी होमस. गायत्री नगर सुचित्रा जेडीमेटला.हैद्राबाद राज्य तेलंगणा) येथे राहत असल्याबाबत खात्रीलायक माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांना मिळाल्यानंतर सदर ठिकाणी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.व पुढील योग्य ती कारवाई करीता गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कामगिरी ही अपर पोलिस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य.पुणे प्रशांत बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे शाखेच्या विभाग के गुन्हे अन्वेषण विभाग राज्य पुणे.डाॅ दिलिप पाटील – भुजबळ.व पोलिस अधीक्षक तांत्रिक सेवा गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे.श्रीमती वैशाली माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक आनंद रावडे.पोलिस हवालदार विकास कोळी.सुनिल बनसोडे.प्रदिप चव्हाण यांनी केले आहे.

    Previous articleपुण्यात लोकसभा निकालापूर्वीच सुरू झाले विजायाचे बॅनर वाॅर!
    Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत भव्य रोड शो.सगळीकडे गर्दीच गर्दी!

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here